दिवसभर उपाशी राहण्याचे दुष्परिणाम!

19/07/2024
Image credit: unsplash.com

एनर्जीची कमी
दिवसभर उपाशी राहिल्यास शरीरात एनर्जीची कमतरता भासते. न खाल्ल्याने शरीरात पोषक तत्वाची कमी निर्माण होते, ज्यामुळे थकवा आणि अशक्तपणा जाणवतो.

Image credit:Canva

मेटॉबॉलिजम
अन्नाशिवाय मेटॉबॉलिजमची गती कमी होते. यामुळे वजन वाढतं आणि वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी धोकादायक आहे. 

मेंदूवर परिणाम
उपाशी राहिल्याने मेंदूला आवश्यक ग्लुकोज मिळत नाही. परिणामी लक्ष केंद्रीत करण्यास अडचणी येतात. मानसिक थकवा जाणवू शकतो. 

Image credit: unsplash.com

पचनाच्या समस्या
बराच काळ उपाशी राहिल्याने पचनसंस्थेवरही नकारात्मक परिणाम होतो. यामुळे अ‍ॅसिडिटी, गॅस, अल्सरसारख्या समस्या उद्भवतात.

Image credit: Canva

जेवणाशिवाय मूड स्विंग्स आणि चिडचिडेपणा येतो. जेवणामुळे समाधान मिळतं. मात्र उपाशी राहिल्याने मूड बिघडतो.

Image credit: Canva

इम्युनिटी
बराच काळ उपाशी राहिल्याने शरीरातील इम्युनिटी यंत्रणा कमकुवत होते. यातून आजार किंवा संसर्गाचा धोका वाढतो. 

06/05/2024 Image credit: Canva

वजन वाढणे
जेव्हा तुम्ही बराच काळ उपाशी राहता, तेव्हा पुढील जेवणापर्यंत शरीरात कॅलरी जमा होते. यातून वजन वाढण्याची शक्यता वाढते. 

Image credit:Canva

आणखी वाचा

रिकाम्या पोटी कोमट पाणी पिताय?

marathi.ndtv.com